लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कोरची 13, डिसेंबर :- कोरची येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग मुख्यालयापासून अंदाजे १२ कि.मी. अंतरावर असलेल्या हूडूकदुमा बेतकाठी जोडणारा व बेतकाठी डुमरगुचचा छत्तीसगड हे दोन्ही पूल तुटल्याने गावकऱ्यांचे छत्तीसगडमध्ये जाने अडचणीचे ठरत आहे तर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हुडूकदूमा येथील विद्यार्थी बेतकाठी येथील धनंजय स्मुती विद्यालयात १० ते १२ शाळकरी विद्यार्थी याच मार्गाने येजा करीत असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे कधी पण मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच हूडकदूमा वाशीयांना कार्यालयीन कामे व बाजारपेठेत जाण्याकरीता हा मार्गच एकमेव पर्याय असल्यामुळे नागरिकांनी मार्ग क्रमन करावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य व गावकऱ्यांची अडचण बघता तातडीने या पुलाचे युद्ध पातळीवर दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बेतकाठी हुडूकदुमा पुलाचे बांधकाम सन 2017 मध्ये केले होते पण हे पुल एका वर्षात वाहुन गेले होते तेव्हा पासून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या पुलाकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या परिसरातील नागरिक व विद्यार्थी अडचणीत दिवस काढत आहेत तर सन 2012 मध्ये दोन राज्यांती शेतकरी शेतमजूर यांना जोडणारा बेतकाठी डुमरघुचचा छत्तीसगड हा पुल गेल्या 2014 पासून पावसाळ्यात वाहून गेला तरी गेल्या 8 वर्षा पासून बेतकाठी येथील नागरिकांनी कोरची जिल्हा परिषद बांधकामकडे अनेकदा तक्रार दिली पण कसलीही कारवाई केली नाही त्यामुळे छत्तीसगड राज्यातील डुमरघुचचा येथील नागरिकांनी जेसीबी मशीन भाड्याने घेऊन वाहतूक व्यवस्था करण्यासाठी रपटठा तयार करून जिव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत त्यामुळे या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज नागरिका व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा :-