आदिवासी भागात उत्पन्नवाढीचा नवा अध्याय : योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले – ८५% अनुदानाची संधी, अर्जासाठी अंतिम मुदत ३१ जुलै

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २८ मे – आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी शासनाने मोठा पुढाकार घेतला असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने अनुसूचित जमातींसाठी उत्पन्ननिर्मितीच्या विविध योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

या योजनांतर्गत लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, ३१ जुलै २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

🛠️ शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत – योजनांचा विस्तृत लाभ..

या योजनांचा उद्देश केवळ आर्थिक मदत न राहता, स्वावलंबनाची दिशा देणे हा आहे. योजनांमध्ये पुढील बाबींसाठी अनुदान दिले जाणार आहे :

शेतकऱ्यांसाठी काटेरी तार fencing पीक संरक्षणासाठी स्प्रे पंप (बॅटरी किंवा हँड ऑपरेटेड)

ताडपत्री शेततळे धारकांसाठी मत्स्यसंवर्धन साहित्य बेरोजगार युवकांसाठी लघुउद्योग, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य व मदत महिलांसाठी टू-इन-वन शिलाई मशीन खरेदीसाठी विशेष प्रोत्साहन..

शेतकरी गटांसाठी थ्रेशर मशिन खरेदीसाठी अनुदान..

ही योजना केवळ वस्तू खरेदीपुरती मर्यादित नसून, एकूणच आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक सक्षमीकरणाचा भाग आहे.

📑 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी:

1. अनुसूचित जमातीचे वैध जातप्रमाणपत्र (उपविभागीय अधिकारी यांच्या सहीसह)

2. रहिवासी दाखला

3. चालू वर्षातील उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्या सहीसह)

4. ग्रामसभा ठराव

5. आधार कार्ड

6. आधार लिंक असलेले बँक खात्याचे स्पष्ट छायाचित्र

7. अपंग, विधवा, परित्यक्ता, निराधार महिला असल्यास त्याबाबतचा अधिकृत दाखला

📅 अर्जाची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२५..

संपूर्ण माहिती आणि कागदपत्रांसह पूर्ण अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कार्यालयात ३१ जुलैपूर्वी सादर करणं अनिवार्य आहे.

🌱 एक पाऊल स्वावलंबनाच्या दिशेने..

ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर आदिवासी भागात सामाजिक परिवर्तनाचे बीजारोपण आहे. शासनाचा निधी थेट जमिनीवर उतरतो आहे, आणि स्वप्नांचं अंकुरण सुरू होत आहे. आता गरज आहे ती – सजग नागरिकत्वाची आणि वेळेवर अर्ज करण्याची.