व्हाॅट्सअपचे आले नविन फिचर्स

एकाचवेळी 32 लोकांना लावू शकतो व्हिडीओ काॅल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 06 नोव्हेंबर :-  तुम्ही जर व्हाॅट्सएप वर व्हिडीओ काॅल करण्याचे शौकिन असाल किंवा ग्रुप एडमिन असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. व्हिडीओ काॅल आणि ग्रुप साठी काही नवीन फिचर्स एड करण्यात आले आहे. व्हाॅट्सएपमध्ये आता नवीन फिचर्स एड करण्यात आले आहे.

यात 32 लोकांना एकाचवेळी व्हिडीओ काॅल करता येणार आहे. ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स एड करता येउ शकतात. 2 जीबी पर्यंतची फाईल शेअर करू शकता. नवीन इमोजीस, एडमीन डिलीट फिचरची भर, चॅटच्या सर्वात वर कम्युनिटी चॅट ऑप्शनमधूनही फिचर्स एक्टिव्हेट करता येतील. यापूर्वी पेमेंट फिचर व्हाॅट्सअपमध्ये एड करण्यात आले होते. पण त्याला फारसा मिळताना दिसला नाही. दुसर्या बाजूला प्रतिस्पर्धी प्लॅटफाॅर्मशी स्पर्धा तीव्र होते आणि त्याच पाश्र्वभुमीवर व्हाॅट्सएप् मध्ये नवीन फिचर्स एड करण्यात आले आहे. आता युजर्स या फिचर्सना कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.

हे पण वाचा :-

New featureswhatsapp