नवनियुक्त सरपंच, सदस्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. २८ फेब्रुवारी: आलापल्ली ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहेरी तालुका सचिव यांनी ग्राम पंचायत येथे निवडणुक लढवून यश प्राप्त करून शंकर मेश्राम यांची नवनियुक्त सरपंच या पदावर विराजमान झाले तर पत्रकार संघाचे सदस्य स्वप्नील श्रीरामवार यांनी घवघवीत मतदान प्राप्त करून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडनुकीत विजय प्राप्त केले आहे. यासोबतच  उपसरपंच पदावर विनोद आकंनपल्लीवार यांची निवड करण्यात आली आहे.   

 त्यानिमित्त आज आलापल्ली ग्रामपंचायत भवनात नवनियुक्त सरपंच आणि सचिव सदस्य यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड,  सचिव अनिल गुरुनूले उपाध्यक्ष आसिफ पठाण, अखिल कोलपाकवार, सहसचिव रामू मादेशी, कोषाध्यक्ष अमोल कोलपाकवार, तालुका संघटक उमेश पेंड्याला, संघटनेचे माजी अध्यक्ष प्रशांत ठेपाले, म.रा.म.प.स चे जिल्हा सल्लागार ओमप्रकाश चूनारकर तसेच म.रा.म.प.स चे विदर्भ संघटक प्रमुख श्रीधर दुग्गीरालापाठी, सदस्य रफिक पठाण, सुनील तुरकर, स्वप्नील तावाडे, स्वप्नील श्रीरामवार आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.