वैदर्भीय भाषेत वऱ्हाडी मास्तरांचा ऑनलाइन क्लास.

  • नोकरीसाठीच्या स्पर्धेला अस्सल वऱ्हाडी तडका.
  • वऱ्हाडी मास्तर मायबोलीतून देतोय स्पर्धा परीक्षेचे धडे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. ५ डिसेंबर: संवादाचा सेतू बांधला जातोय तो भाषेतूनच, आणि अभ्यासाच्या सेतुला देखील भाषेचीच जोड लागते. पण भाषा जर अभ्यास पक्का करून देणारी असेल आणि नेहमीच उत्तरं समरणात ठेवणारी असेल तर ती पर्वणीच ठरते. शिक्षणात , अभ्यासात असाच सुरेख मेळ घातलाय वर्ध्यातील एका वऱ्हाडी बोलीतून शिकविणाऱ्या मास्तरने. आता तुम्ही म्हणाल शिक्षकाला असं मास्तर बिस्तर म्हणणं योग्य नाही. पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मित्रांनो जरा थांबा … कारण हे शिक्षकच स्वतः सांगताहेत की शिक्षक या शब्दांपेक्षा मास्तर हा शब्द जास्त लक्षात राहतो, आणि म्हणूनच मायबोलीतून अकर्षकपणे मिळणारे धळे यशही मिळवून देण्यात सार्थक ठरतात. कालपर्यंत ऑफलाईन असणारे हे गुरुजी कोरोनासंकटामुळे ऑनलाइन झाले आणि आता तर ते नेटकऱयांमध्ये लोकप्रियही झालेत.

बीएससी बीएड शिक्षण झालेल्या नितेश कराळे यांनी स्वतः स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी पुण्यात क्लासेस केले. 2013 मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेचा पुणेरी पॅटर्न या पंच लाईनला फोनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी नावानं वर्ध्यात क्लासेस सुरू केले… गावात राहणाऱ्या कराळे यांना गावाची बोलीभाषा चांगलीच अवगत होतीच. याच अस्सल वऱ्हाडी बोलीचा शिकविताना पूर्णतः वापर केला. ऑफलाईन क्लास सुरू असताना देखील ते वऱ्हाडीतच शिकवत होते.

कराळे गुरुजींनी ऑनलाईन क्लास सुरू केले. पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी युट्युबबर व्हिडीओ अपलोड केले.. हळूहळू त्यांचे प्रेक्षक वाढू लागले.. मुंबईतील दोन विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांचे मिम्स केले आणि कराळे यांच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू झाली.. भूगोलातला लाव्हारस, मराठीतले व्याकरण, आणि इतिहास गणित शिकविताना देखील त्याच्या बोलीमुळे विदयार्थ्यांना उत्तरे अगदीच लक्षात राहण्यात मदत होते आहे.