प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत डीबीटी पोर्टल वरील कागदपत्र शेतकऱ्यांनी अपलोड करण्याबाबत सूचना जारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 23 जून : प्रधानमंत्री कृषि सुक्ष्म सिंचन योजना प्रति थेंब अधिक पिक सन 2020-21 (ठिबक/तुषार) अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर गडचिरोली जिल्हयातील आज अखेर 404 लाभार्थ्यांची लॉटरी द्वारे निवड झालेले आहे.

त्यापैकी 37 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड आहेत व उर्वरित 260 लाभार्थी यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. कागदपत्र अपलोड करण्यासाठी माहे जुन अखेर पर्यंत मुदत देऊन विहित कालावधीत अपलोड न केल्या असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधुन रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या लाभार्थ्याची लॉटरी द्वारे निवड झालेली आहे परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यात यावीत अन्यथा कागदपत्रे अपलोड न केल्याल्या लाभार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल असे भा.सा.बऱ्हाटे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांनी शेतकरी बांधवाना कळविण्यात येत आहे.

हे देखील वाचा :

आत्मसमर्पितांसाठी असलेल्या नवजीवन वसाहत येथील कार्यक्रमाप्रसंगी एका जहाल महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्हयात हत्तीरोग दुरीकरण मोहीम 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान

गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर

 

 

 

 

farmerGadchirolilead storymaha dbt portal