लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 2 ऑगस्ट 2023 ; चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली गावात अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, आलापल्ली- आष्टी मार्गे धावणाऱ्या ट्रक चालकांमुळे दारूची मागणी असल्याचे लक्षात येताच जवळपास 20 विक्रेत्यांनी अवैध व्यवसाय सुरू केला. ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी मुक्तीपथ तर्फे आयोजित सघन बैठकीच्या माध्यमातून दारूबंदीचा ठराव घेऊन जवळपास 20 विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आले. सोबतच पोलिस कारवाईचा इशाराही देण्यात आला.
चौडमपल्ली गावात अवैध दारूविक्री बंद होती. परंतु सदर गाव आलापल्ली-आष्टी मार्गावर असल्याने अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकांची नेहमीच वर्दळ असते, बहुतांश ट्रक चालक दारू पित असल्याने त्यांच्याकडून दारूची मागणी वाढू लागली. त्यामुळे गावातील 20 जणांनी दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यामुळे गावात मद्यपींची रेलचेल राहत असून महिलांसह शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मुक्तीपथ गाव संघटना, पोलिस पाटील व ग्रामस्थांनी सघन बैठकीचे नियोजन केले.
यावेळी मुक्तीपथचे आनंद सिडाम यांनी अवैध दारूविक्री बंदीसाठी उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार गावकऱ्यांनी दारूबंदीचा ठराव घेऊन 20 दारू विक्रेत्यांना रितसर नोटीस देण्यात आले. यापुढे कोणी दारू विक्री केल्यास त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्याची सुचना दिली.
हे पण वाचा :-