लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : गडचिरोली ते चंद्रपूर मार्गे प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत असते. चंद्रपूर आगाराला ई-बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळेच चंद्रपूर आगाराने नियमित बसेस बंद करून त्याऐवजी एसीची व्यवस्था असलेल्या ई- बसेस सुरू केल्या आहेत.
चंद्रपूर आगाराने गडचिरोलीसाठी दर दिवशी ई-बसच्या २० फेऱ्या सुरू केल्या आहेत. या सर्व ई- बसेस एसीयुक्त आहेत. आतासध्या हिवाळा सुरू असल्याने एसीची फारशी गरज नाही. मात्र उन्हाळ्यात प्रवाशांना ही बस आल्हाददायक प्रवासाचा अनुभव करून देणार आहे.
गडचिरोली येथून नागपूर व चंद्रपूर हे सर्वाधिक प्रवाशी मिळणारे मार्ग आहेत. त्यामुळे या दोन मार्गावर सर्वाधिक बसेस चालविल्या जातात. नागपूरसाठी दिवसाच्या जवळपास ४० फेऱ्या व चंद्रपूरसाठी ५० फेऱ्या सोडल्या जातात. चंद्रपूर व नागपूर या दोन मार्गाच्या माध्यमातून गडचिरोली बस आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे या दोन मार्गावर प्रत्येक दिवशी सर्वाधिक बसेस सोडल्या जातात.
पूर्वी नागपूर आगारातून गडचिरोलीसाठी शिवशाही बसेस चालविल्या जात होत्या. परंतु यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने या बसेस बंद करण्यात आल्या असून . नागपूरसाठी आता नियमित बसेसनेच प्रवास होत आहे.
हे ही वाचा,