लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळून महायुतीचे सरकार स्थापन झाले असून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ मधून वगळण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटले. असून छगन भुजबळांनी राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घेण्याची घोषणा केली होती. तसेच यावेळी ओबीसी एल्गार पुकारु, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीपूर्वी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली.छगन भुजबळांकर अन्याय झाला पण आम्ही ओबीसी समाज म्हणून त्यांना एकटे पाडू देणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थिती त्यांच्या मागे उभे आहोत. छगन भुजबळ सत्तेत असतील किंवा नसतील आम्ही त्यांच्यासोबत आहोत”, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने जरांगे पाटील आता अधिक तीव्रतेने आंदोलन करण्याची शक्यता आहे. अशातच सरकारने दबावाने ओबीसींवर अन्याय होऊ देऊ नये अशी अपेक्षा आहे. ओबीसी प्रश्न आणि छगन भुजबळांसाठी गरज पडली तर रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची आमची तयारी आहे”, असेही प्रकाश शेंडगेंनी म्हटले. ओबीसी नेत्यांच्या या बैठकीनंतर लगेचच छगन भुजबळ हे एक बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ते महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घेतल्यास महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी आता महायुतीचे नेते सरसावले आहेत.
हे पण पहा,