मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य,नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विशेष प्रतिनिधी

नाशिक दि.२४ ऑगस्ट :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले आहेत. राणेंच्या अटकेसाठी विशेष पथक देखील नेमण्यात आले आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटताना दिसत असून, नारायण राणे यांना अटक होणार का ? आणि अटकेनंतर त्याचे राज्यात काय पडसाद उमटतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांनी दि. २३/०८/२०२१ रोजी महाड, जि. रायगड येथे पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांचे बद्दल बदनामीकारक, व्देषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजामध्ये शत्रुत्वाची व व्देषाची भावना निर्माण होईल असे विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यां फिर्यादिवरून नाशिक शहरतील सायबर पोलीस स्टेशन, येथे आज दिनांक २४.०८.२०२१ रोजी राणे यांच्या विरोधात भादवि कलम ५००, ५०५ (२), १५३-ब (१)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे.

सदर गुन्हयाची गंभीरता व्यापकता लक्षात घेता
मा. केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांना तात्काळ अटक करून मा. न्यायालयासमोर हजार करण्यासाठी संजय बारकंड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), नाशिक शहर यांच्या नेतृत्वात पथक स्थापन करून या गुन्हयाचा तपास युनिट-१ च्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी करण्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी यांनी दिले आहेत. त्यामुळे आता नारायण राणे यांना अटक होणार का ? आणि अटकेनंतर त्याचे राज्यात काय पडसाद उमटतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

जुहू मध्ये युवा सेना – भाजप कार्यकर्ते भिडले. पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत.

 

मुंबईत दादर टी टी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे फोटो बँनर लावून त्यावर “कोंबडी चोर !!!” असं नारायण राणेंना झोंबणारे शब्दं लिहीलेत. त्यामुळे मुंबईत वातावरण तणावपुर्ण झालंय. याचे पडसाद आणखीन तीव्र उमटण्याचीही शक्यता व्यक्तं केली जातेय.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे