नागपंचमी निमित्त नागदेवता मंदीराला माजी राज्यमंञी श्रीमंतराजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थीती.

मंदीर दुरुस्तीचे आश्वाषन देऊन, हजारो भाविकाना स्वहस्ते केला केळी व हलवा प्रसादाचे वाटप भक्तगणात उत्साहाचे वातावरण.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

आलापल्ली, 22 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गाच्या ठिकाणी नयनरम्य असे एकमेव सुप्रसिध्द नागदेवता मंदीर असुन हे मंदीर मौजा आलापल्ली पासुन सिरोंचा महामार्गावरील अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर आहे. असे असता नागदेवता मंदीरामध्ये नागपंचमी निमित्त फार मोठी जत्रा भरत असुन या जत्रेत आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशातुन मोठ्या संख्येने भाविक भक्तगण श्रध्देने येतात.

विशेष करुन जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली या तालुक्यातील हजारो श्रध्दालु भाविक भक्तगण नागदेवता मंदीरात मनोभावे पुजा करतात. तसेच नवसाला पावणारा नागदेवता आहे. अशी अनेक भाविकांची धारना आहे. सदर मंदीरास नागपंचमीला दर्शनार्थी भाविक भक्तगणांची सकाळपासुन दर्शनाला रिघ लागलेली असते. मंदीर परीसरात याञेकरुच्या सोईकरीता अनेक दाते महाप्रसाद, दाळभात, बुंदा प्रसाद, दुध वितरण करतात. यावेळी अहेरी राजनगरीतील माजी राज्यमंञी  राजे अम्बीशराव महाराज यानी सकाळपासुन हजारो भाविकाना स्वहस्ते हलवा प्रसाद व केळीचे वाटप केले.तसेच त्यांनी नागदेवता मंदीराच्या विश्स्त कमेटीची बैठक घेऊन मंदीर बांधकास आर्थीक मद्दतीची घोषणा केली.

त्यांनी मंदीर व मंदीराचा संपुर्ण परीसर फिरुन बघीतलं व त्या ठिकाणी शेड, मंदीर, वीज व पाण्याची योग्य प्रकारे सोय करुन देण्याचे आश्वासन दिले व यापुढे दरवर्षी नागपंचमीला उपस्थित राहण्याचे आश्वाषन दिले. या वेळी राजे अवघेश्वर महाराज, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमार्, भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, वासुदेव पेद्दीवार, प्रा.पद्मनाभ तुंडुलवार, व्यंकटेश मदेर्लावार, सेनि.वनपाल मानेपल्ली, सेनि वनपाल मडावीजी, शरद पोलोजवार, चंदु बिट्टीवार,अक्षय करपे या सह असंख्य नागरीक उपस्थीत होते. मंदीरातील दर्शन व परीसरातील जत्रेचा अनेकानी आनंद लुटला सर्व यात्रीकरुणा  माजी राज्यमंञा अम्ब्रीशराव महाराजानी शुभेच्छा दिले.

हे पण वाचा :-