लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
पुणे: पुण्यात डेक्कन परिसरात भिडे पुला जवळ, माझी नदी माझी व्हॅलेंटाईन, अर्थात मुठा मुळा नदीची स्वच्छता करण्यासाठी मोहीम आज राबवण्यात आली. सेंट्रल ब्यरो ऑफ कम्युनिकेशन केंद्रीय संवाद ब्युरो, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय छात्र दल, वाॅरशिप अर्थ संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ही मोहीम पार पडली. या स्वच्छता मोहिमेत पुण्यातल्या शाळा आणि महाविद्यालयातल्या एक हजारहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित विद्यार्थी तसंच मान्यवरांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री राजकुमार राजनसिंग, पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराग काळकर, रिजनल आऊट्रीच ब्युरो चे निखिल देशमुख, सिने अभिनेते प्रवीण तरडे, उप आयुक्त ग्रामीण पोलीस संदीप गिल, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निलय उपाध्याय यांना मान्यवरांच्या हस्ते मुळा मुठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.