लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
धानोरा, ९ ऑगस्ट : “सेवाच हाच धर्म” या भावनेला मूर्त रूप देत जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोडापे परिवाराने सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणेने आणि प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियानांतर्गत, धानोरा तालुक्यातील चव्हेला गावातील १० क्षयरोग उपचाराधीन रुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून दत्तक घेऊन त्यांना प्रोटीनयुक्त व सकस पोषण आहार वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर कोडापे परिवाराने रुग्णांना पोषण किट्स देत त्यांच्या आरोग्य आणि मनोबल वृद्धीचा संकल्प केला. हा उपक्रम केवळ अन्नपुरवठा नसून, आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना मानसिक बळ देणारा आणि समाजात आरोग्यजागृतीची ठिणगी पेटवणारा ठरला.
या वेळी चव्हेला ग्रामपंचायत सरपंच अशोक बढाई, से.नि. पोलीस निरीक्षक विशेषराव पोटी कोडापे, से.नि. आरोग्य सेविका जिजाबाई कोडापे, से.नि. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव आलाम, सहायक अभियंता वैभव सिडाम, शीतल सिडाम, गोपिका शेडमाके, मंजुषा कोडापे, इंजि. पायल कोडापे, जेनिका कोडापे, सुमित आलाम, प्रकाश कोडापे, वेदात घुमे, बेली शेडमाके, गिरीश लेनगुरे (STS), रकीम शहा (आरोग्य निरीक्षक), श्रीकांत कोडापे (आरोग्य सेवक), सदाशिव मंडावार (आरोग्य सेवक), आशा उर्मिला गावळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची भीषण धडक; आठ वर्षीय शौर्यचा जागीच मृत्यू, वडिलांचा हात-पाय मोडला