लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क : भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला मॅनहोल मध्ये पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल पडलेल्या पावसामध्ये भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक त्या मॅनहोल मध्ये पडल्या.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह हा कमी असल्याने त्या दोन्ही महिला थोडक्यात बचावले. अन्यथा त्या दोन्ही महिलांच्या जीवावर बेतलं असतं. भांडुप मध्येच दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक महिला मॅनहोल मध्ये पडून मृत्युमुखी पडली होती.
हे देखील वाचा :
गावांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी महाविकासआघाडीची नवी योजना; 10823 कोटींचा प्रकल्प