लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता रूपरेषा’ (National Higher Education Qualifications Framework–NHEQF) या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय शिक्षक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न होणारआहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कुलगुरू, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, डॉ.श्रीनिवास वरखेडी, आणि कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक चे कुलगुरू प्रो.हरेरामजी त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, डॉ. श्रीराम कवळे,आणि कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ डॉ. अनिल हिरेखण उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रशांत ठाकरे, सॉफ्ट कॉम्पोनंट समन्वयक, PM-USHA,गोंडवाना विद्यापीठ यांनी केले आहे.उच्च शिक्षणाच्या नवीन वाटचालीवर मार्गदर्शन करणारा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांशी निगडित विषय सखोलपणेउलगडणारा हा कार्यक्रम सर्व शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सर्व प्राध्यापक, शिक्षक व अभ्यासकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.