जिल्हयातील २ हजार २२७ युवा बेरोजगारांना ‘मुख्यमंत्री दूत’ म्हणुन संधी !

शासनाच्या विविध विभागांमध्ये आहेत कार्यरत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळन्याकरिता मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २७७ युवकांना रोजगार मिळाला आहे.

सदर योजनेंतर्गत  युवकांना अस्थायी तत्त्वावर शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २७७ युवकांना शासनाच्या विविध विभागातील  आस्थापनांमध्ये मानधन तत्त्वावर काम करण्याची संधी मिळालेली असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत सुरुवातीला सहा महिन्यांच्या तत्त्वावर युवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात कौशल्य विकास व उद्योजकता विभाग कार्यालयाद्वारे तीन मेळावे घेण्यात आलेले असून  या मेळाव्यांमधून १३० युवांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात ४५८ ग्रामपंचायती असून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक याप्रमाणे ४५८ युवकांची  नेमणूक शिपाई/सहायक पदावर करण्यात आलेली आहे. सदर युवकांकडून शिपाईपदाच्या कामापासून  ते संगणक हाताळणी, पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे करून घेत आहेत.

जिल्ह्यातील पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन व मदत केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन युवकांना नियुक्ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकूण २८६ युवांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच  जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ६७७ युवांची प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून ते  जि.प. शाळांमध्ये अध्यापनाचे काम करीत आहेत. अशी एकूण २ हजार २२७ युवा बेरोजगारांना ‘मुख्यमंत्री दूत’ म्हणुन संधी देण्यात आलेली आहे.

हे पण बघा,

मुंबईच्या समुद्रात पुन्हा अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक,

 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे – आ विजय वडेट्टीवार

ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे दुखद निधन..

 

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून उद्योजकजिल्ह्यातील २ हजार २७७ युवकांना रोजगार मिळाला आहे.राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळन्याकरिता मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली