खुशखबर! शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,चंद्रपुर येथे पदवी अणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २२ डिसेंबर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपुर  येथे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास क्रमांचे दर्जेदार शिक्षण अवगत केले. ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पाडल्यामुळे राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे अभिनंदन केले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील एकमेव एन.बी.ए. मानांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना सन १९९६ मधे झाली. मागील २३ वर्षापासून राज्याच्या सर्वच भागातील विद्यार्थ्यानी या महाविद्यालयात शिक्षणाचा लाभ घेतला.

महाविद्यालयात प्रामुख्याने स्थापत्य, यन्त्र, विद्युत, अणु विद्युत, उपकरणीकरण आणि संगणक अभियांत्रिकी अशा विविध शाखामध्ये शिक्षण उपलब्ध आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपुर येथे शिक्षण घेण्यासाठी खुल्या प्रवार्गा करीता २५०९५/- एस.सी/एस.टी विद्यार्थ्या करीता १५९५/- व्ही.जे/एन.टी विद्यार्थ्याकारिता ६५९५/-, ओ.बी.सी विद्यार्थ्याकरीता ६५९५/-, इ.बी.सी विद्यार्थ्या करीता १७५९५/- आणि टी एफ डब्लू एस विद्यार्थ्यासाठी १०,०९५/- इतकी शैक्षणिक फी आहे आणि एक विशेष म्हणजे राज्य सरकारचे महाविद्यालय असल्यामुळे येथे शिक्षण अगदी कमी शुल्कात करता येणे शक्य आहे . शिक्षण घेताना राज्य सरकारकडून सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, इतर मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल प्रवर्गातिल सर्व विद्यार्थ्याना नियमित शिष्यवृत्ती देण्यात येते.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,चंद्रपुर

महाविद्यालयात शिक्षण घेतांना १७६ मुलासाठी आणि १५६ मुली करिता कमी खर्चात रुपये २५७०/- रु प्रति वर्ष अशा अत्यंत कमी शुल्कात राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद हे उच्च शिक्षित असल्यामुळे मुलांना येथे चांगले शिक्षण घेण्यास वाव आहे.

जागतिक बँकेकडून महाविद्यालयाला मिळालेल्या निधितुन महाविद्यालयाच्या प्रयोगशाला तसेच इतर संसाधने विकसित करण्यात आलेली आहेत. संस्थेच्या स्थापत्य विभागातील अद्यावत प्रयोगशाला मधील  आधुनिक उपकरणाच्या आधारे या भागातील बऱ्याच शासकीय तसेच खाजगी प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या धातुंची व इतर मटेरिअलची तपासणी करण्यात येते. महाविद्यालयातील प्रशिक्षण व आस्थापना विभागातर्फे विद्यार्थ्याकरीता वेगवेगळया कंपन्यामध्ये प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग एंड प्लेसमेंट विभागातर्फे विद्यार्थ्यांना टाटा कंसल्टेंसी सर्विसेस, आय.बी.एम, एल.एंड.टी. अशा नामांकित कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रोजगार आणि प्रशिक्षण लक्षात घेता संस्थेतर्फे टाटा कंसल्टेंसी सर्विसेस आणि टाटा टेक्नोलोजी लिमिटेड या कंपन्या सोबत विशिष्ट करार प्रस्थापित करण्यात आले आहेत.

महाविद्यालातिल सहा शाखा पैकी यंत्र, विद्युत् आणि उपकरणीकरण या विभागांना NBA मानांकन प्राप्त झाले आहे. संशोधानांच्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाकडून महाविद्यालयात सेंटर फॉर हायर लर्निंग एंड रिसर्च या केंद्रासाठी मान्यता मिळाली आहे. या केन्द्रा मुले आपल्या भागातील मुलाना येथेच पदवी शिक्षणा सोबत पदव्युत्तर आणि उच्च शिक्षण घेणे शक्य होइल. आपल्या भागातील मुलाना पदव्युत्तर शिक्षण सोईचे व्हावे या करीता सन २०१९ पासून यन्त्र अभियन्त्रिकी विभागात मैकेनिकल  इंजीनियरिंग डिजाईन आणि विद्युत अभियांत्रिकी विभागात इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरु करण्यात आले .

प्रथम वर्षात प्रवेश घेताना ७०% जागा ह्या चंद्रपुर आणि गडचिरोली येथील मुलासाठी राखीव आहेत तर ३० % जागा इतर जिल्ह्यातील मुलासाठी आहेत. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिये संदर्भात विस्तृत माहिती साठी खालील मोबाइल क्रमांकाशी संपर्क साधू शकता.

डॉ. दिलीप मघाड़े – ९८८१२७७०९३, प्रा. सुधीर बुरांडे – ९२८४०४०९४०,

प्रा. श्रीकृष्ण वाघ – ९४२०५६१३३८

डॉ. पांडुरंग लोंढे – ८६६८७४७३४८ प्रा. विक्रम गवली – ९४२२३०९१६३  तरी महाविद्यालयातील सुविधा लक्षात घेउन चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर येथे पदवी अणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ सुधीर आकोजवार यांनी केले आहे.