शिक्षणसेवकांचे नियमितीकरणाचे आदेश अडकले लाल फितीच्या कारभारात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे 17 जानेवारी :- पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या 129 शिक्षणसेवकांचा 3 वर्षांचा कालावधी सप्टेंबर 2022 मध्ये पूर्ण झाला आहे. मात्र प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे 5 महिने उलटून सुध्दा सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षणसेवकांना केवळ 6 हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण सेवकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा या शिक्षण सेवकांनी दिला आहे.

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले 129 शिक्षणसेवकांना कुणी वाली उरला नाही असे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षण सेवकांच्या या प्रश्नावर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार विचारणा केली असता अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. या शिक्षणसेवकांचे नियमितीकरण होण्याबाबत कोणती अडचण आहे याचे कारणही जिल्हा परिषदे कडून दिले जात नाही. निरडावलेल्या जिल्हा परिषद प्रशासनामुळे शिक्षणसेवकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्हा तातडीने कार्यवाही करून शिक्षणसेवकांचे नियमितीकरणाचे आदेश काढावेत अशी मागणी पुणे जिल्ह्य़ातील शिक्षणसेवकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा या शिक्षण सेवकांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या शिक्षण सेवकाबाबत कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :-

paymentpune colectorpune education departmentsave teachershikshan shevak