एक दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर, 12 एप्रिल : रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळावा या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आज नागपूरातील प्रशासकीय इमारत क्रमांक 2 येथे एक दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. जिल्ह्याच्या विविध भागातून उमेदवार या मेळाव्यासाठी उपस्थित झालेले होते.

या मेळाव्यामध्ये उमेदवारांना ऑटोकॅट ड्राफ्टमॅन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वेबपेज डेवलपर, सर्वेव्हर, ऑफीस बॉय या पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यावेळेला पात्रताधारक उमेदवारांची नोंदणी करण्यात आली त्यानंतर त्यांना रोजगाराच्या संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळेला उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले.

हे पण वाचा :-