स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा प्रसंगी १४ ऑगस्ट रोजी सायकल रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १३ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असलेल्या पार्श्वभुमी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमीत्य केंद्र शासनाने विविध कार्यक्रम करण्याबाबतचे कळविले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली द्वारा दि. 14/08/2022 रोजी सकाळी 07.00 वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली पासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या रॅलीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेनी सायकलीसह सायकल रॅलीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमात सहभागी व्हावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.

 

bicycle rallyGadchirolilead news