टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई च्या वतीने जिल्हास्तरीय वनहक्क कार्यशाळेचे आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर ,६ जुलै – टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई ही जिल्हातील १०० गावांमध्ये वनहक्क कायदा २००६ अंतर्गत प्राप्त सामुहिक वनहक्क ग्रामसभेच्या सक्षमीकरणावर मागील तीन वर्षापासून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसभा व प्रशासनासोबन कार्य करीत आहे. त्यामध्ये जनजागृती, प्रशिक्षण, व्यवस्थापन व प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील लोकाना मिळवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नरत आहे. यातच जिल्हातील विविध वनहक्कावर कार्यरत सामाजिक संस्था, समाजसेवक, ग्रामसभा सदस्य, प्रशासकीय अधिकारी व पत्रकार यांचे समन्वय करून वनहक्क प्राप्त ग्रामसभांना कायद्याच्या अंमलबजाणीसाठी येत असलेल्या विविध अडचणी, शासन निर्णय, गावनिहाय आकडेवारी, सिमांकन, व्यवस्थापन आराखडे, नरेगा यंत्रणा, वन विभागांची धोरण इ. विषयांवर चर्चा व उपाय यावर विचार मंथन या कार्यशाळेत करण्यात आले. प्रशासनाच्या विविध विभागाकडून लागणारे सहकार्य त्यांचा मेळ घालण्यासाठी सदर कार्यशाळेचे विश्वकर्मा भवन, चंद्रपूर येथे दिनांक ०३/०७/२०२४ ला आयोजन करण्यात आले होते.

“सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभाना वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी व प्राप्त वन क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन, व्यवस्थापन प्रभावीपणे व्हावे व त्यासाठी संघटना, संस्था व प्रशासनाने एकत्रित विचारमंथन करण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा कार्यशाळा सतत होणे गरजेचे आहे” असे मत टाटा सामाजिक विज्ञान संस्थान चे संशोधन अधिकारी अमोल कुकडे यांनी व्यक्त केले.

प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून पुढील बाबतीत अपेक्षित सहकार्य मिळावे असे चर्चेतून ठरविण्यात आले. आणि सर्व स्तरावरून याचा पाठ पुरावा देखील केला जाईल असा निर्णय झाला.
१ .वनहक्क कायदाच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करणे.
२ .ग्रामसभा व प्रशासकिय कर्मचारी यांना सामूहिक वन हक्क कायदा बाबत ची भूमिका अधिक स्पष्ट करणे.
३.वनविभाची कायद्याची अंमलबजावनी संदर्भात सकारात्मक भुमिका असावी.
४. प्राप्त वनहक्क क्षेत्राचे सिंमाकन निश्चित करणे.
५. वनहक्क प्राप्त ग्रामसभाना नरेगा यंत्रणा घोषित करणे
६. वनहक्क क्षेत्रात नरेगाच्या कामाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे
७. गौण वन-उपजांचे योग्य व्यवस्थापन करून उपजीविका संसाधन वाढविण्यासाठी ग्रामसभाना प्रोत्साहित करणे
८. मत्सपालन व मासेमारीसाठी (मामा ) तलाव ग्रामसभाना व्यवस्थापनासाठी देणे.
९. वन गौण उपज प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी साहाय्य करणे
१०. सामूहिक वनहक्क व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी विविध विभागाचे सहकार्य
११. प्रत्येक वनप्राप्त गांवामध्ये व्यवस्थापन समिती गठित करावी व अकार्यक्षम समिती चे पुर्नगठित करणे.
१२ . व्यवस्थापन समितीचे बँक अकाउट खाते उघडण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे
१३ .जिल्हास्तरावरून प्रशासनाकडुन विविध शासन निर्णय (पत्र) काढणे
१४.विविध अभ्यास दौऱ्याचे नियोजन करणे-
१५.सक्षम ग्रामसभा, संघटना व संस्था सोबत वेळोवळी बैठकीचे आयोजन करणे.
१६. गौण वन उपज संकलन, साठवणूक, विक्री ची प्रक्रिया जास्तीत जास्त ग्रामसभा प्राप्त अधिकाराने करतील यासाठी मार्गदर्शन करणे. सदर कार्यशाळेमध्ये रिवॉर्ड, एफई एस, टीआरआय, जागृती, सेंटर फॉर पॅस्ट्रालिझन इ. संस्थेचे प्रतिनिधी,पत्रकार, एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी, तालुका वनहक्क व्यवस्थापक वैष्णवी, रजनी व टाटा सामाजिक संस्थेचे हिमानी, नितीन, अमोल, जगदीश व प्रवेश सोबतच ठाणे आणि रायगड चे प्रतिनिधी व ग्रामसभेचे सभासद उपस्थित होते.