लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पेरमिली 02, डिसेंबर :- PLGA नक्सल सप्ताहाचे अनुषंगाने भव्य शांतता व व्यसनमुक्ती रॅली चे उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे मा.पोलीस अधीक्षक निलोत्पल सर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सर यांच्या संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकुर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सरपंच किरण नैताम, उपसरपंच प्रमोद आत्राम, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मावलीकर सर, उन्नती महिला प्रभात संघ पेरमिलीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, मुक्तीपथ संघटनेचे आनंद कुमरे, तसेच सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ महिला उपस्थित होते. सदर रॅली दरम्यान प्रभारी अधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना लोकशाही संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले, रॅलीमध्ये उपस्थित महिलांनी व शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, लोकशाही, व्यसनमुक्ती, गाव दारुबंदी, स्त्री पुरुष समानता याबाबत जोरदार घोषणा दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि अजिंक्य जाधव, सी आर पी एफ चे पोनि दीपक देशमुख तसेच सर्व जिल्हा पोलीस, एस आर पी एफ, सी आर पी एफ चे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी संघभावनेने परिश्रम घेतले.
सदर रॅलीमध्ये हद्दीतील 300 ते 350 जनसमुदाय उपस्थित होता.
हे देखील वाचा :-
https://fb.watch/hhsIndVGF3/