पेंशन मेळावा तसेच ई-पीपीओ कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 05 ऑगस्ट – जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारक तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे करिता दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 12.30 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, गडचिरोली येथे पेंशन मेळावा व ई-पीपीओ बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. संबंधितांनी सदर मेळाव्याला व कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्तीवेतन, गडचिरोली यांनी कळविले आहे.

pension