लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेची माहिती गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवार, विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य यांना वेबिनारद्वारे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अर्ज प्रक्रियेबाबत (उदा. अर्ज कसा करावा, आवश्यक दस्तऐवज कोणते जोडावेत, इ.) संपूर्ण माहिती मिळून ऑनलाईन सुविधांचा प्रभावी वापर करता यावा यासाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत समर्तापर्व अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेबिनारची लिंक https://meet.google.com/qqx-zeyy-wgc अशी आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थी व पालकांनी या जिल्हास्तरीय वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, देवसुदन एन. धारगावे यांनी केले आहे