शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाची झुम आढावा सभा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. २२ मार्च: आज अहेरी तालुक्यातील सर्व शाळेतील शिक्षकांना शाळेबाहेरची शाळा या रेडिओ कार्यक्रमाच्या अपडेट, डेटा व समोरील नियोजन संदर्भात zoom च्या माध्यमातून उद्बोधन देण्यात आले.  

कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. सदर मिटींगला अहेरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती निर्मला वैद्य यांनी मार्गदर्शन केले. तसेच गटसाधन केंद्र अहेरी, साधन व्यक्ती ताराचंद भुरसे यांनी प्रास्ताविक केले.

जि.प.उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा, केंद्र राजाराम येथील उपक्रमशील शिक्षक सुरजलाल येलमुले यांनी “विद्यार्थ्यांचे शिक्षणात खंड पडू नये व शिक्षणात समाजाचा सहभाग वाढावा. विद्यार्थ्यांचा ऐकू प्रगत व्हावा, यासाठी लाॅकडाऊनच्या काळात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व आकाशवाणी नागपुर केंद्राने उचललेले क्रांतिकारी पाऊल आहे.” असे मनोगत व्यक्त केले. तसेच छल्लेवाडा शाळेतील विद्यार्थीनी कु. रक्षा गुरनुले हिने हा कार्यक्रम आम्ही लाऊडस्पिकरच्या माध्यमातून नियमित ऐकतो त्यामुळे गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होते. तसेच आम्हाला आत्मविश्वास पुर्वक बोलण्याची सवय लागावी. आकाशवाणी कडून पुरविण्यात येणारा अभ्यास स्वतः करत असल्याने स्वतः अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होते. असे अनुभव प्रतिसाद केले.

प्रथम एज्युकेशन MME सुधीर कोटांगले यांनी कार्यक्रमाची माहिती देत डेटा, फार्मेट व लिंक समजावून दिली. New on air हा ऍप सर्व पालक व शिक्षकांनी वापर करून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले. श्रीकांत पावडे यांनी कार्यक्रमातील अडचणी व त्यांचे निराकरण केले.या ऑनलाईन वेबीणारमध्ये अहेरी तालुक्यातील शिक्षक, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती यांनी सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य लाभले. मा. गटशिक्षणाधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली आढावा सभा संपन्न झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गर्गम यांनी केले तर आभार प्रदर्शन साधनव्यक्ती किशोर मेश्राम यांनी केले.

शाळा बाहेरची शाळा