मुंबईत रात्रभर पाऊसाने मध्य रेल्वे ठप्प, रस्ते वाहतुकीवर ही पावसाचा परीणाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.  मुंबई आणि परिसरात बुधवार पासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे.

मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.  मुंबई आणि परिसरात बुधवार पासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे. पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणीच पाणी, अंधेरी सबवे, सायन, गांधी मार्केट, हिंद माता परिसर पाण्याखाली गेलं आहे.

काही रेल्वे स्थानकांमध्ये पाणी साचल्याने लोकल वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला घाटकोपर विद्याविहार चेंबूर या स्थानकांमध्ये ट्रॅक वरती पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये शहरात आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

भूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

 

lead storymumbai rains