लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खा. अशोकजी नेते यांचे जनसंपर्क कार्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन उपलब्ध आहेत. ज्या गरजू नागरिकांना किंवा कोविड बाधीत मात्र होम आयसोलेशन मध्ये असलेल्या नागरिकांना ऑक्सिजन लागत असल्यास संपर्क साधावा. व या निःशुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.