गडचिरोली जिल्हयातील धान खरेदी 95 केंद्रांवर सुरु.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.08 डिसेंबर: गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 या पणन हंगामासाठी दिनांक 29 सप्टेंबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतून बिगर आदीवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन यांचेमार्फत 16 धानखरेदी केंद्र व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. यांचेमार्फत 40 धान खरेदी केंद्र व उप प्रादेशिक व्यवस्थापक (उच्च श्रेणी), अहेरी यांचे मार्फत 39 अशी एकूण 95 धान खरेदी केंद्र सुरु करण्याकरिता मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अद्यापपर्यत मान्यता दिलेली असून या सर्व केंद्रावर धान खरेदी सुरु झालेली आहे.

खरीप पणन हगाम धान खरेदीचा कालावधी दिनांक 1 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 , खरीप पणन हंगाम (रब्बी/उन्हाळी) दिनांक 1 मे 2021 ते 30 जून 2021 असा राहील.
अभिकर्ता संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य सह. आदिवासी विकास महामंडळ. गडचिरोली (आदिवासी क्षेत्रासाठी) खरेदी केंद्राचे ठिकाणे तालुका कोरची केंद्राचे गावे पुढील प्रमाणे – कोटरा, बेतकाठी, बेंडगाव, बोरी, मसेली, कोटगुल, चवीदंड, तालुका कुरखेडा – मालेवाडा, येंगलखेडा, कुरखेडा, आंधळी, घाटी, गेवर्धा, वडेगांव (नान्ही), गोठणगाव, सोनसरी, पलसगड, कढोली, शिरपूर, उराडी, अंगारा, तालुका आरमोरी – देलनवाडी, दवंडी, कुरुंडीमाल, तालुका वडसा – पिंपळगाव, गडचिरोली तालुका – पोटेगाव, चांदाळा, धानोरा तालुका – रांगी, धानोरा, दुधमाळा, कारवाफा, मोहली, सोडे, चातगांव, चामोर्शी तालुका – मक्केपल्ली, आमगांव, सोनापुर, भाडभिंडी, घोट, रेगडी.

अभिकर्ता संस्थेचे नाव – उप प्रादेशिक व्यवस्थापक, (उच्च श्रेणी) आदिवासी विकास महामंडळ मर्या., अहेरी (आदिवासी क्षेत्रासाठी) खरेदी केंद्राचे ठिकाणे तालुका अहेरी केंद्राचे गावे पुढील प्रमाणे – अहेरी, बोरी, कमलापुर, वेलगुर, इंदाराम, उमानुर, अआलापल्ली, पेरीमल्ली, जिमलगठ्ठा, देचलीपेठा, तालुका मुलचेरा – लगाम, मुलचेरा, तालुका सिरोंचा – असअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद, रोमपल्ली, सिरोंचा, झिंगानुर, बामणी, विठ्ठलरावगेठा, पॅटीपाका, तालुका भामरागड – भामरागड, लाहेरी, ताडगांव, कोठी, मत्रेराजाराम, तालुका एटापल्ली – एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसुर, कसनसुन, जारावंडी, गेदा, कोठमी, हालेवार, उडेरा (बुर्गी), हेडरी.

अभिकर्ता संस्थेचे नाव – महाराष्ट्र स्टेट को.ऑप मार्केटिक फेडरेशन, चंद्रपूर (बिगर आदिवासी क्षेत्रासाठी) खरेदी केंद्राचे ठिकाणे तालुका चामोर्शी अंतर्गत पुढील प्रमाणे केंद्राचे ठिकाण – चामोशी, येनापूर, सुभाषग्राम , कुनघाडा, गणपूर, आष्टी, घोट, गडचिरोली तालुक्यात गडचिरोली, मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपूर, मथुरा नगर, सुंदरनगर, आरमोरी तालुक्यात आरमोरी, वैरागड, वडधा (बोरी), वडसा तालुक्यात वडसा, कोरेगाव (चोप) याप्रमाणे धान खरेदी केंद्र निश्चित केलेले आहे.
आधारभूत योजनेंतर्गत धान खरेदीचे दर हे ‘अ’ दर्जाचे धानाकरिता प्रति क्विंटल रु.1888/- व साधारण धानाकरिता प्रति क्विंटल रु.1868/- असे शासनाने ठरवून दिलेले असून या किमतीमध्ये बोनसचा समावेश नाही.

धान उत्पादक शेतकरी व्यतिरीक्त व्यापारी किंवा इतर कोणत्याही इसमाने संबंधित केंद्रावर धावन विक्री करणेसाठी आणल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
धान खरेदी केंद्राची तपासणी करण्याकरिता उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, निरीक्षण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची तपासणी पथक तयार करण्यात आलेली असून, सदर पथकांद्वारे धान खरेदी केद्राची तपासणी केली जाईल. यामुळे किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या निर्देशात बसणारे FAQ दर्जाचेच धान खरेदी केल्या जाईल, याची संबंधितानी नोंद घ्यावी, नॉन FAQ दर्जाचा धान खरेदी / विक्री केल्यांचे तपासणी पथकास निदर्शनास आल्यास जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

जिल्हा कृषी अधिक्षक, गडचिरोली यांनी सन 2020-21 मधील पिक कापणी प्रयोग पुर्ण झालेली नसून, सद्यास्थितीत प्रती हेक्टर 24 क्विंटल धान उत्पादकता ठरवून दिलेली आहे. पिक कापणी प्रयोग अहवाल पुर्ण झाल्यानंतर त्यात बदल (कमी/जास्त) होण्याची संभावना आहे.

तसेच, धानासाठी आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त 17% इतके राहील. तेव्हा शेतकऱ्यांनी आपले स्वच्छ व कोरडे असलेले धान खरेदी केंद्रावर विक्रीस आणावे. विहीत प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान खरेदी केंद्रावर स्विकारल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांवनी त्यांचे गाव ज्या खरेदी केद्रास जोडलेले आहे, त्यच केंद्रावर धान विक्रीसाठी घेवून जावे. दुसऱ्या खरेदी केंद्रावर धान खरेदी केल्या जाणार नाही. धान विक्रीकरीता शेतकऱ्यांनी त्यांचे केद्रावर ऑनलाईन नोंदणी (NeML वर) करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी खरेदी केद्रावर धान विक्रीकरिता येतांना सोबत आधारकार्ड व चालु असलेले बँकेच्या बचत खात्याचे पासबूक व ज्यावर धानपिकाची नोंद आहे, असा चालु वर्षाचा 7/12चा उतारा आणणे अनिवार्य राहील. समाईक क्षेत्र असणाऱ्या 7/12 वर समतीपत्र देणे बंधनकारक राहील. तसेच खरेदी केद्रावर शेतकऱ्यांनी सीमांत, लघु मध्यम व मोठे शेतकरी अशी जमीन धारणेवर आधारीत तसेच अनु.जाती, अनु.जमाती, इतर व अवर्गीकृत अशी वर्गवारी करावयाची असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केद्रावर त्याबाबत माहिती द्यावी.
करिता धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यापारी / दलाल / मध्यस्थांच्या मदत न घेता थेट शासकीय खरेदी केद्रावर धानाची विक्री करावी. तथापि, धान उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजार दरांनी धानाचे विक्री केली असल्यास त्यांना चालु वर्षाचा नमुना 7/12 व बँक खात्यांचा तपशील देणे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी जिल्हयातील शेतकरी बांधवाना केले आहे.