पालघर: कोव्हीड नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ गुरसाळ यांनी रुग्णालयाला दिल्या सूचना

  • नागरिकांनी तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर, दि. १३ एप्रिल: सद्यस्थितीत राज्यात कोविड-१९ संसर्गाने बाधित रुग्ण आढळत असल्याने कोव्हीड रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य यंत्रनेवरचा तान कमी करण्यासाठी  नागरिकांनी तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले.  

कोव्हीड रुग्णांवर मुख्यत्वे शासकीय रुग्णालय , संलग्न रुग्णालये व महानगरपालिका रुग्णालयांतून उपचार करण्यात येत आहेत. तथापि, दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोव्हीड -19 बाधित रुग्णांच्या उपचारासाठी खाटा कमी पड़ू नये यासाठी रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या आहेत.

या सूचना मध्ये रुग्णालय यांनी तातडी नसलेल्या सर्व नॉन कोवीड शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात., रुग्णालयात पुरेसा मास्क, ग्लोज , पर्सनल प्रोटेक्शन किट व आवश्यक  औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा, ज्या नॉन कोवीड रुग्णांच्या बाबतीत परिस्थितीत पूर्णता; नियंत्रणाखाली आहे. तसेच गंभीर परिस्थिती नसलेल्या रुग्णांना (ज्यांना बाह्य रुग्ण उपचाराद्वारे रुग्ण सेवा देणे शक्य आहे.) घरी सोडण्यात यावे व अशा प्रकारचे नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नये., नॉन कोवीड अंतररुग्ण असलेल्या रुग्णा जवळ केवळ एकाच नातेवाईकास थांबण्याची परवानगी देण्यात यावी.

रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना शिंकणे, खोकणे याबाबतचे नियम पाळण्याची व मास्कचा वापर व हाताळणीबाबतची शास्त्रशुद्ध माहिती देणारे व कोवीड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्याची दक्षता हात धुणे, अन्न सेवन व स्वत:ची व सभोवतालची स्वच्छता पाळणेबाबतची भित्तीपत्रके रुग्णालयात लावावीत. सर्व रुग्णालयांच्या आवारात अथवा जवळपास औषधी दुकाने त्यावर होणारी गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. उपरोक्त सचूना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावलीमधील तरतूदीनुसार  जिल्हास्तरीय, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय महापालिका, धर्मदाय रुग्णालये व खाजगी रुग्णालये तसेच तालुका स्तरावर नगरपरिषद व नगरपंचायत व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

Palghar Collector