लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर डेस्क दि 6 : जुलै – ऑक्टोबर २०१ ९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये १२५३९०००० / – ( अक्षरी बारा कोटी त्रेपन्न लाख नव्वद हजार रुपये मात्र ) अनुदानाची मागणी करण्यात आली होती . त्यापैकी रक्कम रुपये ६२६९५५००/ -( अक्षरी सहा कोटी सव्वीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपये मात्र ) इतके अनुदान शासन महसूल व वन विभाग यांचेकडून प्राप्त झालेले आहे. सदरच्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणेबाबत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
तसेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१ ९ मध्ये झालेल्या ” क्यार ” व ” महा ” चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये ४२७४७८००० / – ( अक्षरी बेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठ्याहत्तर हजार रुपये मात्र ) अनुदानाची मागणी करण्यात आली होती . त्यापैकी रक्कम रुपये ३८ ९ ५६७००० / – ( अक्षरी अडोतीस कोटी पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार रुपये मात्र ) इतकी मदत बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली होती . उर्वरीत रक्कम रुपये ३७ ९ ११००० / – ( अक्षरी तीन कोटी एकोणऐंशी लाख अकरा हजार रुपये मात्र ) इतके अनुदान शासन , महसूल व वन विभाग , मंत्रालय मुंबई यांचेकडून प्राप्त झालेले आहे . सदरच्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणेबाबत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना आदेश देण्यात असून ते लवकरच नुकसानग्रस्त यांना प्राप्त होतील असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यानी सागितले.