पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

मनोज सातवी, पालघर, 28 एप्रिल- चला चला हो जाऊया..मतदान करायला जाऊया..हक्क आपला बजाऊ या.. कर्तव्याला जाऊया.. अशी साद घालत पालघरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे.

पालघर शहरातील हुतात्मा चौक परिरसत शनिवारी २७ तारखेला पालघरच्या भगिनी समाज विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं . यावेळी त्यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाही म्हणजे काय हे नागरिकांना पटवून देत जनजागृती केली. नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा, निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि लोकशाही बळकट करावी या हेतूने हे मतदार जनजागृती अभियान पथनाट्याच्या माध्यमातून शहरात राबविण्यात आले.

https://youtu.be/E-WbbjY70eE

Comments (0)
Add Comment