विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी केली घोषणाबाजी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
अहेरी, दि. २६ नोव्हेंबर: देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी आज २६ नोव्हेंबरला भारत बंद आयोजित केला आहे. या आंदोलनात सरकारी कर्मचारी संघटनेने सहभाग घेतला आहे. यामध्ये आलापल्ली येथील वनविभागाच्या कर्मचारी वर्गानी कामबंद ठेवून पाठिंबा दिला. यामध्ये जुनी पेन्शन लागू करा, आदी सह विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी सुद्धा या वेळी करण्यात आली. अहेरीतही महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद ठेवून संपात सहभाग नोंदविला. अहेरी तहसिल कार्यालयातील संपात नायब तहसीलदार श्री गुहे श्री फारूक कर्मचारी, श्री सत्यनारायण यंबडवार, श्री रोशन दरडे, श्री भीमटे, श्री कोलते, श्री दशरथ मडावी, श्रीमती कुमरे, श्रीमती गर्गम आदींनी सहभाग नोंदविला.