कोरोना महामारीत गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्या – खा. अशोक नेते

  • खा. अशोक नेते यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ एप्रिल: गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. दररोज ३०० ते ४०० कोरोना बाधीत रुग्ण आढळुन येत आहेत तसेच बाधीत रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधा तात्काळ मिळणे आवश्यक आहे त्यात प्रामुख्याने रेमडेसिविर इंजेक्शन, को वैक्सिन तसेच ऑक्सिजन चा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व बाधितांना लवकर बरे करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून आवश्यक आरोग्य सुविधा व औषधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खा. अशोक नेते यांनी आज दि. २३ एप्रिल रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती अवगत करून दिली व जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी ना. फडणवीस यांनी ऑक्सिजन सिलेंडर व रेमडेसीविर इंजेक्शन त्वरीत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी खा. अशोक नेते यांच्या समवेत भाजपचे रणजितसिंह आडे उपस्थित होते.

ashok netedevendra fadnavis