खाजगी कोविड रूग्णालयातील उपचाराबाबतच्या देयकांचे होणार लेखापरिक्षण

जिल्हास्तरीय लेखापरिक्षण समिती स्थापन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 28 : गडचिरोली जिल्हयात सुरू असलेल्या खाजगी तीन कोविड रूग्णालयातील रूग्णांना उपचार केलेनंतर येणाऱ्या देयकांचे लेखापरिक्षण करणेसाठी जिल्हास्तरावर समिती तयार करण्यात आली आहे. सर्व सामान्य रूग्णांना शासनाकडून कोविड उपचारासाठी खाजगी दवाखान्यात किती शुल्क असावे याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने बाधितांवर उपचारासाठी आकारलेले दर योग्य आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये नेमलेल्या लेखापरिक्षकाकडून रुग्णालयांना रूग्णांना आकारलेली देयके तपासून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जर दरांची आकारणी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दि. 21 मार्च 2021 च्या आदेशान्वये नसेल तर जास्तीचे आकारलेले पैसे संबंधित रूग्णाला परत करणेत येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हयातील तीनही खाजगी रूग्णालयांना देण्यात आले आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठीही सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दि. 31 मार्च 2021 च्या आदेशान्वये दर आकारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हयात सद्या ३ खाजगी कोविड दवाखाने : डॉ.कुंभारे व डॉ.दुर्गे यांचे बोदली येथील कोविड हॉस्पीटल, सर्च हॉस्पीटल, चातगाव व नोबेल कोविड रूग्णालय, नवेगाव गडचिरोली या तीन खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करणेसाठी प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

रूग्णांना देयकाबाबत तक्रार असल्यास जिल्हा कोविड नियंत्रण कक्षामधील 07132 – 222030, 222035, 222031 या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

हे देखील वाचा :

मोठी बातमी: दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे होणार मूल्यमापन – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 

gadchiroli districtlead storyprivate Covid Hospital