बसच्या काळ्या धुरांनी जनता हैराण

परिवहन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, 04 नोव्हेंबर :- वसई पश्चिमेकडील डिमार्ट रोडवरून जाणार्या वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची प्रवाश्यांनी भरलेली बस चक्क काळा धूर सोडत असल्याने जनता हैराण झाली आहे. या प्रकारामुळे परिवहन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या बसने अचानक पेट घेतला होता. त्यामुळे महानगरपालिकेेच्या बसने प्रवास करायचा कसा असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

वेळच्या वेळी गाड्यांचे मेंटनन्स न ठेवणे, यामुळे अल्पावधीतच परिवहन सेवा किती दुर्बळ झाली आहे हे लक्षात येते. याला पूर्णपणे महानगरपालिकेचा परिवहन विभाग जबाबदार असून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याकडे तातडीने लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा भविष्यात या प्रवासी बसला मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

हे पण वाचा :-

are shockedby the blackfumes ofPeoplethe bus