औषध कंपन्यांकडून खंडणी मिळाली नसल्याने राज्यातील जनता मृत्यूच्या दाढेत; सदाभाऊ खोत यांचा पत्रपरिषदेत घणाघाती आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सातारा, दि, १९ एप्रिल: महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोनाच्या मृत्यू  दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या मृत्यू दराला ठाकरे सरकार जबाबदार आहे. असा घणाघाती आरोप सदाभाऊ खोत यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.  

ते म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यानी रेमडेसिवीर या इंजेक्शनची योग्य वेळेत खरेदी व साठा केला, परंतु महाराष्ट्र सरकारने मात्र दुसरी लाट येणार येवढाच डांगोरा पिटायच काम केल असून लाट थोपवण्याच्या अनुशगान काहीच काम केल नाही. डीपीडीसतला पैसा या सरकारच्या आमदार मंत्र्यांनी वाटुन खाल्ला, रस्ते करण्याची गरज नव्हती, मानस वाचवण्याची गरज होती. ग्रामीण विकास खात्याच्या अंतर्गत प्रत्येक आमदाराला २० कोटीचा फंड राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आमदारांना दिला गेला. हे पैसे जिल्ह्यातील आरोग्यासाठी दिला असता तर मोठ्या प्रमाणात आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या असत्या.  

सदाभाऊ खोत म्हणाले की, रेमडेसिवीर हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि उपलब्ध सुध्दा आहेत. परंतु औषध निर्माण खात्याच्या माध्यमातून राज्यशासनाच्या अडमुट्य भूमिकेमुळे हे इंजेक्शन आम्ही खरेदी करणार. अशी भूमिका घेतल्यामुळे कोणत्याही उत्पादनाने कुठल्याही मेडिकलला इंजेक्शने देऊ नयेत. जर इंजेक्शने कुठे खासगी स्वरूपात विकल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. असे सरकारने सांगितले आणी दुपटीपनाची भूमिका घेतली. तसेच हे इंजेक्शन साडेसहाशेलाच आम्हाला द्या असे सांगितले. परंतु उत्पादकांना बाराशेच्या खाली हे इंजेक्शन परवडत नव्हते सरकारला जर साडे सहाशे च्या वरती हे इंजेक्शन परवडत नव्हतं तर मेडिकल ला त्यांनी हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी का परवानगी दिली नाही.  ज्याचा जीव जात आहे ती माणसं आज रेमडेसिवीर इंजेक्शन साठी वन वन फिरत आहेत.  त्यांनी ती इंजेक्शन दुकानातून खरेदी केली असती. परंतु एक तर सरकारने इंजेक्शन खरेदी केले नाहीत. ना प्रायव्हेट मेडिकल वाल्यांना ती इंजेक्शन खरेदी करून दिली नाहीत. याचे कारण औषध निर्माण मंत्रालयाला यातून खंडणी गोळा करायची होती. देशामध्ये कुठेही मेडिकल वाल्यांनी हे इंजेक्शन खरेदी करू नये. हा आदेश नसताना महाराष्ट्रातच हा आदेश निघतो कसा. औषध निर्माण मंत्रालयाचं कमिशन ठरले नसल्याने त्यांना योग्य खंडणी न मिळाल्यानेच या राज्यातील जनता मृत्यूच्या दाढेत ढकलून दिलेला आहे. हे इंजेक्शन न मिळाल्याने राज्यातील जनता मृत्यूच्या दाढेत या मंडळींनी ढकलुन दिले आहे. असा आरोपही त्यांनी केला.

खोत म्हणले की, हे सरकार तुमच्या बापाची जागीर नाही हे औषध निर्माण मंत्रालयाचा ओएसडी शिंदे साहेबांचा खंडणीखोर वसुली करण्यासाठी नेमला आहे. ठाकरे सरकार या राज्याचे मुख्यमंत्री ओएसडी वर कारवाई करणार का? राज्यातील मृत्यूला जबाबदार धरुण ओषध मंत्रालयाचे ओएसडी यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करणार का? असा सवालही त्यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत केला आहे.

Sadabhau Khot