ठाकरे गटाचा प्लॅन – बी तयार !

शिंदे गटही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ! किरण पावसकर यांची माहीती .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 13,ऑक्टोबर :- ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने अद्याप मंजूर केला नसल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात देखील हे प्रकरण नेले आहे. मात्र निकाल ऋतुजा लटकेंच्या विरोधात गेल्यास उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात शिवसेनेने आपला प्लॅन बी आखला आहे. यानुसार शिवसेनेतील प्रमुख तीन नेत्यांची नावे पुढे करण्यात आली आहेत. यात माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक प्रमोद सावंत, माजी नगरसेवक कमलेश राय ही नावे पुढे आली आहे. यासोबत लटके यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीचे नावही चर्चेत आहे.

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास सहानुभूती चा लाभ घेण्यासाठी लटके घराण्यातील एका व्यक्तीसाठी उमेदवारी साठी प्लॅन बी सुरू आहे. स्व.रमेश लटके यांचे आई-वडील वृद्ध आहेत.त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकत नाही. पण लटके यांचे बंधू सुरेश लटके यांना उमेदवारी देण्याचा प्लॅन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचा आहे.त्यामुळे लोकांची सहानुभूती ठाकरे गटाला मिळू शकते.

दरम्यान शिंदे गट ही निवडणूक लढवणार असे शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी काल रात्री प्रसार माध्यमांना सांगितले. तसे झाले ते भाजप चे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल यांना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागेल. प्रसंगी पक्षादेश असेल तर माघार घेण्याचे सूतोवाच मुरजी पटेल यांनी दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे देखील वाचा :-

१३ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

mumbaishivsenathakarey gutudhav thackarey