लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली , 21 सप्टेंबर : गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन प्लॅस्टिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आरोग्य तपासणीसाठी उपचार घेणे अतिशय महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊपचार करता यावे, याकरिता चातगाव येथील सर्च रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
शनिवार २३ सप्टेंबर २०२३ ला प्लॅस्टिक व पुनर्रचानात्मक शस्त्रक्रिया ओपीडी आयोजित केली आहे, सुप्रसिद्ध प्लास्टिक शल्यचिकित्सक डॉ.श्रीरंग पुरोहित व टीम मुंबई या ओपीडीमध्ये आरोग्य तपासणी करतील.
ओठखंड, फाटलेला टाळू, चेहऱ्यावरील धमनीविरोधी, तिरपी मान, काखेमधील सूज, जळलेल्या त्वचेचे संकुचन, पुरुषात स्तनांची वाढ, जन्मता: जोडलेली बोटे, सामान्य पेक्षा जास्त बोटे, मूत्रमार्ग लिंगाच्या खाली उघडणे या प्रकारचे लक्षणे असणार्यांनी ओपीडीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन चातगाव येथील सर्च रुग्णालयाने केले आहे.
हे पण वाचा :-
https://youtu.be/KfrvVWBQ2lY