लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्रात वाहन चोरीचे प्रकार वाढल्याने त्याबाबत वेळोवेळी कठोर कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. त्यानुसार कोटगुल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्राचा तपास सुरु असताना सिसिटीव्ही फुटेजच्या मदतीने 25 मार्च रोजी पोउपनि.l दयानंद शिंदे यांनी आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे याची ओळख पटवली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा टेमली इथून 19 वर्षीय आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याचा साथीदार टेमनलाल रामखिलावन साहू, वयवर्ष 19 वर्षे यांचही नाव समोर आलं. चौकशी दरम्यान या दोघांनी सी.जी-07-बी.व्ही.-5653, किंमत सुमारे 30 हजार रुपये ही दुचाकी चोरी केल्याचं कबूल केलं. त्यांनतर दोन्ही आरोपीना 25 मार्च रोजी पोलिसांनी अटक करून जिल्हा न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयान ya दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
यानंतर त्यांच्या अधिकच्या चौकशीतून विविध ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या सुमारे 3 लाख 15 हजार किमतीच्या 9 दुपाची यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. या दुचाकी l आरोपींकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे कोटगुल येथील पोउपनि. दयानंद शिंदे करत आहेत.
सदर तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, वरिष्ठ पोलीस अभियान अधीक्षक यतिश देशमुख, वरिष्ठ पोलीस प्रशासन अधीक्षक एम. रमेश तसंच कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल येथील कृष्णा सोळंके यांच्या नेतृत्वात करण्यात आला