लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर 1 डिसेंबर :- नागपूर कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याचा रॅकेटचा नागपूर शहर पोलिसांनी केला भांडाफोड केला असून या प्रकरणी कारागृहातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड अशी कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून हे दोघे कारागृहातीलच 5 कैद्यांचा मदतीने इतर कैद्यांसाठी गांजा, विविध खाद्यपदार्थ, कपडे, पैसे बेकायदेशीरपणे कारागृहात आणत होते. याची गुप्त माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळताच या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आला. धंतोली पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हेगार कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे बनविणे अश्या गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक केली आहे.
हे पण वाचा :-