खोकल्याचे औषध समजून किटकनाशकाचे सेवन केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे, दि. ३० मार्च: बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोपट विष्णू दराडे असं त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दराडे तीन दिवसांपासून खोकल्याने त्रस्त होते. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याची ड्युटी संपवून पोपट दराडे घरी गेल्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास होत होता म्हणून त्यांनी खोकल्याचे औषध समजून घाईत शेतात फवारणी करण्याचे किटकनाशक सेवन केले. त्या नंतर काही क्षणातच त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी तातडीने कुटुंबियांना याची कल्पना दिली. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले गेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.