पोलीस नक्षल चकमक : १३ मृत नक्षल्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस!

पैडी जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत कसनसूर दलमच्या एकूण ६० लाख रु. बक्षीस असलेल्या १३ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
  • १३ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा.
  • मृत नक्षलवाद्यामध्ये ६ पुरुष व ७ महिलांचा समावेश.
  • आणखी ४ ते ५ नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता.
  • गडचिरोली पोलीस दलाचे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री  महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केले कौतुक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परिसरात नक्षलवादी दरवर्षी प्रमाणे तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्यामुळे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा पैडी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना दिनांक २१ मे रोजी सकाळी ६ ते ७.३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना जीवे ठार मारण्याच्या व जवानांचे हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला.

                         गडचिरोली पोलीस दलाचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले कौतुक

त्यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येणे बाबत आव्हान केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येत पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, सी-६० जवानांनी प्रत्युतरादाखल व संरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी दिड तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलीसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

                                                             नक्षल्यांचे मृतदेह

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळी ६ पुरुष नक्षलवादी ७ महिला असे एकूण १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असून सदर मृतक नक्षलवाद्यांची ओळख आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून पटवून घेण्यात आली.

अ.क्र. मृतक नक्षलवाद्यांचे नाव दलम चे नाव पद बक्षीस
१. नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी कसनसूर एलओएस एसीएम ६ लाख
२. सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा कंपनी-४ डिव्हीसीएम १६ लाख
३. किशोर  उर्फ शिवा उर्फ शिवाजी बारसू गावडे कंपनी-४ पीएम ४ लाख
४. रुपेश उर्फ लिंगा मस्तारी गावडे कसनसूर एलओएस उपकमांडर ६ लाख
५. सेवंती हेडो कसनसूर एलओएस पीएम २ लाख
६. किशोर होळी पैदी एरिया जनमिलीशिया २ लाख
७. क्रांती उर्फ मैना उर्फ रीना माहो मट्टामी कसनसूर एलओएस पीएम २ लाख
८. मुनी उर्फ बुकली धनु हिचामी कंपनी-४ पीपीसीएम ४ लाख
९. रजनी ओडी कसनसूर एलओएस पीएम २ लाख
१०. उमेश परसा कसनसूर एलओएस एसीएम ६ लाख
११. सगुणा उर्फ वसंती उर्फ वत्सला लालू नरोट चातगाव दलम पीएम २ लाख
१२. सोमरी उर्फ सुनिता उर्फ सविता पापय्या नैताम कसनसूर एलओएस सदस्य ६ लाख
१३. रोहित उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सन्नु कारामी कसनसूर एलओएस सदस्य २ लाख

वरील मृतक नक्षलवाद्यांवर खून, जाळपोळ, चकमक इत्यादी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच यात नग एके ४७ रायफल, ५ नग एसएलआर रायफल, स्टेनगन १ नग, ३ नग ३०३ रायफल, ८ एमएम बंदूक २  नग,  १ नग पिष्टल इत्यादी भरपूर प्रमाणात स्फोटके मिळून आले तसेच नक्षलवाद्यांच्या दैनदिन जीवनात वापरात येणारा साहित्य मिळून आले.

                   नक्षलवाद्यांचे स्फोटके तसेच दैनंदिन जीवनात वापरात येणारा साहित्यसाठा

सी-६० कमांडोच्या या शौर्यापूर्ण कामगिरीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कौतुक केले, सदर वेळी अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नक्षलविरोधी अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक(प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.

हे देखील वाचा :

पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

 

Gadchiroli Poolicelead story