उद्या पासून होणार पोलीस भरती प्रक्रिया सुरू

राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पदांची होणार भरती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, ०९ नोव्हेंबर :-  नुकतीच जाहीर झालेली पोलीस भरती काही कारणास्तव स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया परत सुरू होणार आहे. आता १८ हजार ३३१ पदांकरीता पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकार तर्फे देण्यात आले आहे. ९ नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहे. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का? असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरीता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे. म्हणलेच कोरोना काळात अर्ज केलेल्या आणि ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे अशा उमेदवारांना पोलीस भरतीत संधी मिळणार आहे.

पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक अशा एकुण २१,७६४ पदांची भरती होणार असून यासाठी शैक्षणिक पत्रता १२ वी पास असणे आवश्यक आहे. ही भरती महाराष्ट्राकरीता असून खुल्या वर्गासाठी १८ ते 18 से २८ वयोमर्यादा तर मागासवर्गीयांसाठी १८ ते ३३ वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४५०/- रू, मागास प्रवर्गासाठी ३५९/- रू अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायवयाचे असून उद्या ९ नोव्हेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. उमेदवार अर्ज www.mahapolice.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर करावे.

हे पण वाचा :-

policeprocessrecruitment