लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या कारवायांवर अंकुश निर्माण करण्यासाठी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम पेंनगूंडा येथे केवळ २४ तासांत नव्या पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली. अतिसंवेदनशील परिसर असल्याने येथे गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
भामरागड तालुक्यातील पेनगुंडा परिसरात नक्षल कारवायांच्या दृष्टीने पोलीस स्टेशनच्या मदतीने छत्तीसगड सीमेवरून जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या नक्षलवाद्यांवर करडी नजर ठेवण्यास मोठी मदत मिळावी यासाठी अतिसंवेदनशील आदिवासी बहुल नक्षल प्रभावित या भागात नक्षलांचा बिमोड करून विकास कामांना गती मिळण्यासाठी पोलीस मदत केंद्रांची गरज होती. त्यादृष्टीने गडचिरोली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पेंनगुंडा गावात एकाच दिवसात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. महत्त्वाचे म्हणजे या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन स्थानिक गावातील आदिवासीं वयोवृध्द महिलेकडून करून गावातील लहान, मोठ्याना पोलीस अधिकाऱ्यांनी कपड्याचे वितरण करून गोडतोंड करण्यात आल्याने स्थानिक आदिवासी बांधव भारावून गेले होते.
नक्षल्याचा बीमोड कण्यासाठी गडचिरोली पोलिस सशक्त.
जवळपास १५०० पोलीस जवानांच्या मदतीने एका दिवसात हे पोलीस स्टेशन उभे करण्यात आले. सदर परिसर छत्तीसगड सीमेलगत असून या ठिकाणी अनेकदा नक्षलचकमक उडाली आहे तर कित्येकांना नक्षल्यांनी खबऱ्या असल्याच्या संशयावरून सामान्य माणसाला क्रूरतेने जीव घेतला आहे. एवढेच नव्हे तर विकास कामावर नक्षल्याने जाळपोळ करून कोटी रुपयाचे नुकसान केले असल्याने पोलीस मदत केंद्र निर्माण करणे काळाची गरज होती . सामान्य भोड्या भावड्या आदिवासी बांधवात नक्षलयांची भीती कमी होऊन सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता येवून विकासाला गती मिळावी हाच पोलिसांचा मुख्य हेतू आहे.
या भागात रहदारीसाठी मार्ग नसल्यानें सामान्य नागरिकांची मोठी अडचण होते. मात्र आता पोलिसांच्या देखरेखित विकास कामाला गती मिळणार असून रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामळे बंद होणारे लवकरच काम होणार आहे. जिल्ह्यात दक्षिण गडचिरोलीत नक्षली कारवाया थोडक्यात वाचल्या असून आता नक्षलही चळवळ कमकुवत होत असून कित्येक नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा करून यश प्राप्त केले आहे . नक्षली कारवायावर अंकुश निर्माण करण्यासाठी नवीन पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची रस्ते,तसेच येनाऱ्यावर करडी नजर..
पेनगुडा येथे एकाच दिवशी पोलीस मदत केंद्रात वायफाय सुविधेसह सुसज्ज असलेल्या पोर्टा कॅबिन, मॅकवॉल, सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी, केंद्रीय राखीव दलाचे अधिकारी जवान, जवळपास ३०० पोलीस कर्मचाऱ्यांना होच फाटा तैनात करण्यात आले आहेत. दोन महिन्यात संपूर्ण परिसर स्वच्छ करून या ठिकाणी अपेक्षित असं पोलीस स्टेशनची निर्मिती करून पेन गुंडा परिसरातील नक्षलंच असलेला भयमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी पोलीस कृती दल सक्षम उभे आहे.
केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 10 ट्रेलर, 04 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 20 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 04 अधिकारी व 45 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 14, छत्रपती संभाजी नगरचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 113 बटा. सी कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 70 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 06 पथक (150 कमांडोज) तैनात करण्यात आले आहे.
यावेळी नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस महानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल,पोलीस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव बलाचे पोलीस महानिरीक्षक टी,विक्रम पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय राखीव बलाचे जयविर सिंगअपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीन देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) आर रमेश, भामरागडचे उपविभागीय अधिकारी अमर मोहिते पोलीस मदत केंद्राचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.