पास्थळ – सालगाव ग्रामपंचायत समस्या बाबत सकारत्मक चर्चा

पास्थळ वासीयांसाठी आंबट गोड मैदानाची गोड बातमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पालघर, 6 ऑक्टोंबर : पालघर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पास्थळ -सालगाव हद्दीतील विविध समस्या सोडवण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद पालघर खासदार कक्षात गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामस्थ, अधिकारी उपस्थित राहुन समस्यांचा पाडा वाचला असुन खासदार राजेंद्र गावित यांनी सकारात्मक सोडवण्यात आला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
पास्थळ-सालगांव ग्रुप ग्रामपंचायत गावांतर्गत सर्वाधिक समस्या गेली बऱ्याच वर्षापासून आहेत. त्याबाबत ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठवा केला होता. परंतु याबाबत समानधारक तोडगा निघाला नाही. यासाठी कायम समस्या सोडवण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांच्या सोबत गुरुवारी बैठक बोलावण्यात आली होती. रासायनिक निश्रिक सांडपाणीमुळे झालेले जल व वायु प्रदूषण, कर वसुली, पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी, आंबट गोड मैदान विकसित करणे,या समस्या सोडवण्यासाठी व मागण्या पूर्ण होण्यासाठी बाबा अणुशक्ती केंद्र येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त सभा लावून प्रलंबित प्रश्न निकाली लावण्यात आले. या बैठकीला सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आंबट गोड मैदान विकसीत करण्यासाठी बी ए आर सी यांच्या सामाजिक दायित्व निधी मधीन रु.आठ कोटीचा CSR विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ह्या मध्ये समुदाय केंद्र, एक हजार बाक (बॅचेस) तसेच क्रीडांगण खेळाडू व प्रेक्षक कक्ष उभारून आंबट गोड मैदान विकसित करण्यात येईल अशी माहिती बी ए. आर.सी. चे संचालक भट सर व भावे सर ह्यांनी खासदार गावित ह्यांना दिली.
आंबट गोड मैदानाची गोड बातमी ऐकताच पास्थल वासीयांनी जय घोष केला.