कृषी पंपाना १६ तास भारनियमन आदेशाला स्थगीती – उर्जामंत्र्यानी दिले आदेश

  • उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित यंत्रणेला ३१ मे पर्यंत येथील भारनियमन आदेश मागे घेण्याचा आदेश दिला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २४ मार्च: कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा, गुरनोली व खेडेगाव येथील विद्यूत फीडर मधून कृषी पंपाना विद्यूत पुरवठा करण्यात येणाऱ्या वाहीनीवर १६ तास भारनियमन तर ८ तास विद्यूत पूरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. यासंदर्भात आज आमदार गजबे यांचा नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मंत्रालयात पालकमंत्री व उर्जामंत्री यांची भेट घेत त्यांचाकडे शेतकऱ्यांची  व्यथा मांडली यानंतर उर्जामंत्र्यानी संबंधित यंत्रणेला ३१ मे पर्यंत येथील भारनियमन आदेश मागे घेण्याचा आदेश दिला.

गेवर्धा, गुरनोली व खेडेगाव विद्यूत फीडर वर १६ तासाचे भारनियमन सूरू करण्यात आल्याने यापरीसरातील ४०० पेक्षा अधिक कृषीपंपधारक शेतकरी अडचणीत आले होते. रबी हंगामात धान पिकाची लागवड या परीसरात करण्यात आली आहे. धानाला अधिक पाण्याची गरज असताना एन हंगामात १६ तासाचा भारनियमन सूरू करण्यात आल्याने शेतकर्यांचे धान पीक करपण्याचा धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात आमदार कृष्णा गजभे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमूख सूरेन्द्रसिंह चंदेल माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समीतीचे सदस्य जिवन नाट कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक व्यंकटी नागीलवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे व उर्जामंत्री नितिन राऊत यांची भेट घेत त्यांचाकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडत भारनियमन आदेशाला स्थगीती देण्याची मागणी केली. सदर मागणीची दखल घेत तात्काळ उर्जामंत्री नितिन राऊत यानी संबंधित यंत्रणेला ३१ मे पर्यंत भारनियमन न करण्याचे आदेश दिले. त्यामूळे या परीसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मीळाला आहे.

Dr. Nitin Raut