जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 02, डिसेंबर :-  1 डिसेंबर रोजी जगतिक एड्स दिन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय पालघर येथे साजरा करण्यात आला. या वर्षाची थीम होती आपली एकता, आपली समानता. एच आय व्ही सह जगणाऱ्यांकरिता. या अनुषंगाने जागतिक एड्स दीना निमित्त येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मिलिंद कुमार मदने, डॉ. मेघशाम कुलकर्णी, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. दीप्ती गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तनवीर शेख, दांडेकर महाविद्यालय, चाफेकर महाविद्यालय, नवोदय विद्यालय व शांताई नर्सिंग विद्यालय वेदांत विद्यालयाचे प्राध्यापक व विध्यार्थी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पालघर जिल्यातील सर्व आय सी टी सी कर्मचारी व स्थानिक संस्था उपस्थित होत्या . सकाळी 10.30 वा. प्रथम रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षिका डॉ. दीप्ती गायकवाड तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानवी साखळी शपथ वाचन करण्यात आले. त्यानंतर दांडेकर महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यांनी तसेच चाफेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

प्रभात फेरीचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करण्यात येवून हि प्रभात फेरी ग्रामीण रुग्णालय पालघर येथून पाचबत्ती, रेल्व् स्टेशन माहीम रोड आर्यन हायस्कूल, भगिनी समाज शाळा व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय पालघर येथे प्रभात फेरीचे समारोप करण्यात आला. जिल्हा पर्यवेक्षिका प्रफुल्लता चुरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केल.

हे देखील वाचा :-

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

aids dayaids day rallypalgharPrabhat PheriWorld AIDS Day