गडचिरोली जिल्ह्यातील मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांचा नितीनजी गडकरी यांचे हस्ते सत्कार

लोकमत लोकनायक कॉफी टेबल बुक सत्कार सोहळ्यात दैनिक लोकमत समूह कडून सत्कार कारण्यात आला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नागपूर :  त्याग समर्पण व निष्ठेने केलेले कुठलेही कार्य यशाकडे घेऊन जाते अविरत कष्ट संयम असेल तर आयुष्यात किती संकटे आले तरी माणूस न डगमगता त्याचा सामना करून मार्गक्रमण करतो राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांचा सामाजिक राजकीय प्रवासही असाच वळण वाटांचा खाचखळग्यांचा होता परंतु ग्रामसेवक म्हणून वीस वर्ष खेड्यापाड्यात सेवा बजावताना गाव खेड्यांचा आदिवासी पाड्यांवरील लोकांच्या सुखदुःखाचे भागीदार राहिलेल्या प्रणय भाऊ खुणे यांनी कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना करून बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले आणि दुर्गम अति दुर्गम भागात भागात त्यांनी 500 किलोमीटरचे रस्ते तयार केले व नक्षलप्रभावित गावांचे रूपडे पालटुन टाकणारे कार्य करून दाखवले, विकासाची आस व समाज कार्याचा ध्यास म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे वतीने त्यांनी केले.

या उल्लेखनीय कार्याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील रहिवाशी प्रणय भाऊ खुणे यांचा आज नागपूर येथे जाहीर सत्कार झाला मित्रांनो सर्वांना आवडणारे व्यक्तिमत्व प्रणय भाऊ खुणे यांचा आज लोकमत कॉफी टेबल बुक करिता त्यांची निवड झाली व लोकमतच्या वतीने आज आयोजित सत्कार कार्यक्रमाकरिता राज्य देशाचे परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्ड चे चेअरमन विजयजी दर्डा , आदरणीय यशोमती ताई ठाकूर माजी मंत्री महिला व बालकल्याण महाराष्ट्र राज्य, आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख व प्रतिष्ठित मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वनामती नागपुर येथे त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा दखल घेऊन लोकमत ग्रुप यांनी त्यांचा सत्कार झाला.

Comments (0)
Add Comment