लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 15 नोव्हेंबर :- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. यावर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना 15 हजारांच जाच मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे.
मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमाआरडीने बांधलेल्या एका पुलाचा लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडता. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. त्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे गाडीत बसून जात असतांना रिदा रशीद या त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. यावेळी त्यांनी रिदा रशीद यांना हाताने बाजूला केले होते. यावर विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो इसे म्हणत ढकलले असा आरोप रिदा रशिद यांनी आपल्या तक्रारीत केला होता.
हे देखील वाचा :-