प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ ने सन्मानीत  

110 देशातील दोन हजार प्राचार्यांचे होते नामांकन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

हिंगोली  : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना हरियाणाच्या अलर्ट नॉलेज सर्व्हिसेस एज्युकेशन संस्थेतर्फे दिला जाणारा ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ जाहिर झाला असून एका ऑनलाईन कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

हरियाणा येथील ए. के. एस. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण व्यवस्थापन व संशोधनमध्ये काम करणाऱ्या या संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण व कौशल्यधिष्ठीत उपक्रम राबवणाऱ्या प्रिंसीपल यांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यासाठी ११० पेक्षा जास्त देशातील २००० पेक्षा जास्त प्राचार्यांनी नामांकन दिले होते. त्यामध्ये प्राचार्य भारद्वाज यांना ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवॉर्ड’ जाहिर करून आज ऑनलाईन कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले.

प्राचार्य भारद्वाज यांनी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात तंत्रज्ञान आणि सोशल मिडीयाचा प्रभावी उपयोग करून शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि विविध कृतिशील उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयावर जनजागृती केल्याबद्दल प्राचार्य भारद्वाज यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

 मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय –  खा. नवनीत राणा

२३ जून : आजचे दिनविशेष

आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील… संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर 

 

 

lead storySanjeev Kumar Bhardwaj